Nashik : पूर परिस्थिती हाताळण्यास प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Nashik Latest Monsoon News
Nashik Latest Monsoon Newsesakal

चांदोरी (जि. नाशिक) : जिल्ह्याच्या इगतपुरी त्रंबकेश्वर परिसरात पावसाचा (Rain) जोर वाढला असून धरणांच्या (Dam) पाणीसाठ्यातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे निर्माण आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. (Administrative machinery ready to handle flood situation in chandori Latest Marathi Monsoon News)

दरम्यान, सद्यस्थितीत धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात संदर्भात सूचना दिलेल्या आहे.सोमवार दि ११ जुलै रोजी दारणा तसेच गंगापूर धरणातून ५०००० हुन अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. येत्या चार दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे.

त्यामुळे उर्वरित धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग होणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या चांदोरी सह परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे.चांदोरीतील वरचा कोळीवाडा,तसेच भैरवनाथ मंदिर परिसरात पुराचे पाणी येण्याची शक्यता गृहीत धरत सूचना दिल्या गेल्या आहे.या पार्श्वभूमीवर तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्थानिक स्वराज्य संस्था व महसूल विभागाच्या सहकार्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने चांदोरी या ठिकाणी एक बोट उपलब्ध करून दिली आहेत. बोटीचा ताबा स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीकडे देण्यात आला आहे.त्याचबरोबर इतर आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आले.

दरम्यान,धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे नदीकाठची धोकादायक अथवा अतिक्रमण केलेल्या नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर प्रशासनाच्या वतीने संबधित ठिकाणी पोलीसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संपर्क साधने,पोहणाऱ्याचे पथक तैनात करणे,स्वयंसेवी संस्थांची मदत, जेसीबी,याचा आढावा घेण्यात आला. कठीणप्रंसगी आपदग्रस्तांच्या वाहतुकीसाठी यंत्रणा कार्यान्वित मंदिर,मंगल कार्यालय ताब्यात घेऊन पूर बाधितांची तात्पुरती व्यवस्था, पोलिसांची गस्त वाढविणे बद्दल संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.या काळआत अन्नधान्याचा मुबलक साठा ठेवण्याच्या सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे अर्चना पठारे यांनी दिली आहे

दरम्यान सोमवार दिवसभरात जिल्हाधिकारी गंगाथरण डी,नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील,प्रांताधिकारी अर्चना पठारे,तहसीलदार शरद घोरपडे, सायखेडा पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी आदींनी चांदोरी सायखेडा परिसरास भेट दिली.

Nashik Latest Monsoon News
जरीफबाबा खून प्रकरण : वाहनचालकासह तिघांना मुंबईतून अटक

सायखेडा पूल वाहतुकीसाठी बंद

गोदाकाठ वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या सायखेडा चांदोरी पूल वाहतुकीसाठी बंद केला असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे

Nashik Latest Monsoon News
नाशिक : महालपाटणे गावाला पुराचा धोका वाढला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com