नाशिक : महालपाटणे गावाला पुराचा धोका वाढला

mahalpatne girna river monsoon latest news
mahalpatne girna river monsoon latest newsesakal

महालपाटणे (जि. नाशिक) : गिरणा नदीवर (Girna River) बांधलेल्या बंधाऱ्याचे फाळके वेळीच न काढल्याने गावात पाणी घुसण्याचा धोका वाढला. स्मशानभूमी, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही विहिरी गेल्या पाण्याखाली. (danger of flood has increased in Mahalpatne village Latest Nashik Marathi News)

निंबोळा येथेही बंधाऱ्यावरील फाळके काढले गेले नाहीत त्यामुळे पूर पाणी अडवले जाऊन नदीकाठावरील शेतजमीन पुरात वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देवळा तालुक्यातील दोन्ही केटी वेअर बंधारे यांची देखभाल करण्याची जबाबदारी सदर गावातील ग्रामपंचायत प्रशासनाकडे होती. ग्रामपंचायत प्रशासनाला फाळके काढण्याचा विसर पडल्याने मोठ्या प्रमाणात हानी होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

mahalpatne girna river monsoon latest news
नाशिक : दरड कोसळल्याने मुळाणे बारी रस्ता बंद

या परिसरात असलेल्या ब्राह्मणगाव, लखमापूर, धांद्री आदी गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी पुराच्या पाण्यात बुडल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ज्या दोन्ही केटीवेअरचे फाळके काढले गेले नाहीत त्यांना पाण्याचा दाब पडून तडा जाऊन प्रसंगी धरण फुटण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे.

mahalpatne girna river monsoon latest news
OBC जातीनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यावे : छगन भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com