मनमाड- लोकांच्या सोयीसुविधांशी थेट संबंध असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर जास्त काळ प्रशासकीय राजवट असणे हे एकाधिकारशाहीकडे जाण्यासारखे असल्याचे मत आता नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे. .तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतिपथावर असून काही कामे लवकरच सुरू होणार आहेत. मात्र विकासकामे सुरू असली तरी प्रशासकीय राजवटीची काही प्रमाणात झळ नागरिकांना बसत आहे..कर्मचारी, अधिकारी गाऱ्हाणे ऐकून घेत नसल्याने नागरिकांच्या विविध समस्या, प्रश्न, स्वच्छता, सोयीसुविधा रेंगाळतांना दिसत आहेत. नगराध्यक्षा सौ. पद्मावती धात्रक यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मनमाड नगर परिषदेवर २९ नोव्हेंबर २०२१ पासून प्रशासकीय राजवट सुरु झाली. ती आजतागायत सुरु आहे. मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर, विजयकुमार मुंडे यांच्यापासून प्रशासकीय राजवट सुरु झाली. त्यानंतर सचिन पटेल आणि आता शेषराव चौधरी हे प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पालिकेवर प्रशासक नियुक्तीच्या पूर्वी पालिकेवरील लोकप्रतिनिधींची असलेली सत्ता चांगली होती..प्रभागातील स्वच्छता, आरोग्य, पाणी, वीज, सोयीसुविधा आदि समस्या घेऊन स्थानिक नगरसेवकास सांगितल्यास त्या मार्गी लागत होत्या. स्थानिक नगरसेवकाकडे हक्काचा माणूस म्हणून पाहिले जाते. मात्र आता प्रशासकीय राजवट असल्याने आपल्या समस्या कोणाकडे घेऊन जाव्यात अशी अवस्था होऊन बसली आहेत. प्रभागातील समस्या अनेकदा कर्मचारी अधिकाऱ्यांना सांगितल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. .नगरसेवक हे आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देत नागरिकांचे कामे करायचे. आता नगरसेवकांचा कार्यकाल संपला आहे. त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाही. वार्डावार्डाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रभागात स्वच्छता राखली जात नाही. साफसफाई करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी येत नसल्याने रस्ते झाडणे, नाल्या साफ करणे, कचरा उचलणे, साफसफाई करणे, घंटा गाडी न येणे, औषध फवारणी न होणे ही कामे होत नसल्याचा आरोप नागरिकांतर्फे होत आहे. तसेच अवेळी पाणीपुरवठा करणे, कमी दाबाने पाणी सोडणे, पथदीपांवर लाईट नसले यासारख्या समस्याही भेडसावत आहे..नगरसेवकांच्या धाकाने कर्मचारी अधिकारी नागरिकांचे कामे करायचे मात्र आता परिस्थिती काहीशी वेगळी आहे. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत असल्यामुळे नागरिक वैतागले असल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करतात. प्रशासकीय काळ सुरु झाल्याने प्रश्न समस्या मांडायच्या असेल तर रीतसर अर्ज करावा लागतो. अनेकदा पालिका कार्यालयात चकरा माराव्या लागतात. समस्या प्रश्न सुटेल याची कोणतीही शाश्वती नसल्याने नागरिकांच्या नागरी सुविधा रेंगाळतांना दिसत आहेत..पालिकेवर प्रशासकीय राजवट असली तरी विकासकामांना खीळ मात्र बसली नाही. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांमुळे शहरात करंजवण पाणीपुरवठा योजनेसह अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर होऊन प्रत्यक्षात कामांना सुरवात झाली. .तर अनेक कामे मंजूर झाली असून काहींचे भूमिपूजन झाले आहेत तर काहींचे कामे सुरु होणार आहेत. यात करंजवण पाणीपुरवठा योजनेतील करंजवण ते मनमाड जलवाहिनी टाकणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र, विविध भागात जलकुंभ उभारणे, अंतर्गत जलवाहिनी टाकणे, महापुरुषांचे पूर्णाकृतीपुतळे, दत्त मंदिर पूल, शहरातील मुख्य रस्त्यांसह इतर रस्त्यांचे कॉक्रिटीकरण पूर्ण झाले आहेत, विविध भागात समाजमंदिर, सभामंडप बांधणे यांची कामे पूर्ण झाली आहेत. महर्षी वाल्मीकी स्टेडिअम, आयुडीपी भागातील व्यापारी संकुल, स्मशानभूमी यांची कामे प्रगतिपथावर आहेत. नगर पालिकेची प्रशासकीय इमारत, भुयारी गटारी, इदगाह पूल, देवी मंदिर पूल यांची कामे सुरु झाली आहेत..मनमाड नगर परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू असली तरी विकासकामांना कुठेही निधी कमी पडू दिला नाही. कोट्यवधींची कामे सुरू आहेत. मनमाड शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. आदर्श आणि सुंदर शहर म्हणून मनमाडची नवी ओळख यानिमित्ताने निर्माण होईल. करंजवण पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यामुळे मनमाडचा पाणीप्रश्न कायमचा मिटला आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यावर पूर्णतः भर आहे. विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. -सुहास कांदे, आमदार.पालिका ही संकल्पनाच लोकप्रतिनिधी नियुक्तीवर आधारित आहेत. लोकप्रतिनिधी असल्याने वार्डातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविल्या जातात. विविध विकास कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जातो. विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मनमाड पालिकेवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासक आहे. त्यामुळे लवकरात लवकर पालिका निवडणूक होणे गरजेचे आहे. -राजेंद्र पगारे, माजी नगराध्यक्ष.नागरिकांना कुठल्याही समस्या जाणवू नये तसेच सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याबाबतचे योग्य नियोजन करण्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांकडून आलेल्या सूचना समस्यांचे त्वरित निराकरण केले जाते. सध्या शहरात विविध विकासकामे सुरु असून काही कामे पूर्ण झाली आहेत. शहराचा पाणीप्रश्न पाहता करंजवण पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहेत. -शेषराव चौधरी, प्रशासक तथा मुख्याधिकारी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.