Land Acquisition
sakal
नाशिक: आडवण- पारदेवी (ता. इगतपुरी) येथे उद्योगासाठी ४०० एकरच्या भूसंपादनावरून काही व्यक्ती न्यायालयात गेल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी (एमआयडीसी) मूल्यांकनाचा प्रस्ताव मुख्यालयात पाठविल्याचे सांगत आहेत. त्यामुळे एकाच विषयावर दोन यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे संपादनाची प्रक्रिया रेंगाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.