MVP Election : प्रलोभनांना बळी न पडता परिवर्तनाला साथ द्या : ॲड. नितीन ठाकरे

Adv. Nitin Thackeray while speaking in the meeting of transformation panel Malegaon.
Adv. Nitin Thackeray while speaking in the meeting of transformation panel Malegaon.esakal

मालेगाव (जि. नाशिक) : वकील संघाच्या निवडणुकीत पराभवासाठी लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्यांना यश आले नाही. आता मविप्रच्‍या निवडणुकीत पैशांचा वापर सुरु असल्‍याचा आरोप अॅड. नितीन ठाकरे यांनी केले. प्रलोभनांना बळी न पडता संस्‍थेच्‍या हिताचा निर्णय घेण्याचे आवाहन त्‍यांनी केले. (Advocate Nitin Thakare statement MVP Election Nashik Latest Marathi News)

मालेगाव येथील सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. वसंत निकम अध्यक्षस्थानी होते. कर्मवीरांबाबत समाजामध्ये दुही माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. पैसा व पैशातून राजकारण हेच सत्ताधाऱ्यांचे धोरण फंडा आहे, असा आरोप त्‍यांनी केला.

Adv. Nitin Thackeray while speaking in the meeting of transformation panel Malegaon.
धारदार हत्यारे घेऊन फिरणारी टोळी गजाआड; कारसह चौघांना घेतले ताब्यात

आमदार कोकाटे यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी सुभाष देसले, मधुकर निकम, मधुकर पवार, काशिनाथ पवार, विक्रम पवार, आर. के. बच्छाव, मनीषा अहिरराव, प्रवीण जाधव, संदीप गुळवे, बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. शिरीष राजे, नानासाहेब दाते, शशी गाडे, राजेंद्र नवले, सोमनाथ कोकाटे, विश्वास मोरे, शिवा गडाख आदींची भाषणे झाली.अॅड. राजेंद्र चव्हाणके यांनी स्‍वागत तर प्रवीण घुमरे यांनी सूत्रसंचालन केले.

सटाणा, देवळा येथे सभांतून संवाद

आपल्या मुलाबाळांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी 'मविप्र'ची सत्ता हवी आहे. त्यासाठी 'परिवर्तन करा, असे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी (ता.१७) केले. सटाणा येथील मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अॅड. पंडितराव भदाणे अध्यक्षस्थानी होते. अॅड.नितीन ठाकरे म्हणाले, की निफाड, चांदवड, येवल्‍यातील सभासदांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. बागलाणमधील मेळाव्यातील गर्दी सर्व काही सांगत आहे. संस्था कुणाची खासगी होऊ नये, यासाठी संघर्ष सुरू असल्‍याचे नमूद केले.

शिरीषकुमार कोतवाल यांनी सभासदांचा मान-सन्मान ठेवला जात‌ नसल्‍याचा आरोप केला. अध्यक्ष भदाणे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय देवरे, मनीषा अहिरराव, मधुकर कापडणीस, दिलीप दळवी, गजेंद्र चव्हाण, आर. के. बच्छाव, बाळासाहेब क्षीरसागर, प्रा. एन. टी. दाते, प्रा. नीलिमा आहेर यांची भाषणे झाली. मेळाव्‍यात ॲड.रवींद्र पगार यांनी चौफेर टोलेबाजी केली.

Adv. Nitin Thackeray while speaking in the meeting of transformation panel Malegaon.
पौरोहित्‍यातही महिलाराज : वाचनाच्या आवडीने पौरोहित्‍याचा प्रवास सुखकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com