धारदार हत्यारे घेऊन फिरणारी टोळी गजाआड; कारसह चौघांना घेतले ताब्यात

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हददीत अवैधरित्या धारदार हत्यारे घेऊन कारमधून संशयितरित्या फिरणारी सराईत टोळी बुधवारी दि.17 सायंकाळी सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेतली. या कारवाईत लोखंडी कोयता, कुकरी ही प्राणघातक हऱ्यारे बाळगणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. (Gangs roaming around with sharp weapons 4 people were taken into custody along with car Nashik latest crime news)

दोडी व खंबाळे गांवाच्या परीसरात काही अनोळखी इसम हत्यार सोबत घेउन कारमधून संशयीत रित्या फिरत असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक श्री. कोते यांना मिळाली होती. पोलीस पथकाने आहेत सदर परीसरात शोध घेतला घेतला असता पुणे महामार्गावरील माळवाडीकडून खंबाळेच्या दिशेने एक सफेद रंगाची मारुती आल्टो कार (क्र.एम एच १५/एफएफ ५८१९) येतांना दिसली.

पोलीस वाहन आडवे उभे करुन ही कार आडवली असता आतमध्ये भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (२३) , गौरव देविदास घोटेकर (२३) दोघे राहणार शहा, ता.सिन्नर, महेश उत्तम वाघचौरे (२१), रा. खंबाळे, ता.सिन्नर व शंकर मधुकर गोळेकर (३२) रा. लोणारवाडी, ता.सिन्नर हे चौघे आढळून आले.

हे चौघेही जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने सहाय्यक निरीक्षक कोते यांनी कारची झडती घेण्याचे आदेश असता कारमध्ये १६ इंच लांबीचा लोखंडी कोयता व एक चाकु (कुकरी) ही प्राणघातक हत्यारे आढळून आली. या हत्यारंबाबत ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी कारसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात वावी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदयान्वये दाखल गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Crime News
अबब! शेतकऱ्यांचा नादच खुळा...!; खिल्लार बैलजोडीची साडेतीन लाखांना विक्री

गेल्या आठवड्यात सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी येथील टोलनाक्यावर तोतया पोलिसांकडून वाहनचालकांना इंट्री च्या नावाखाली लुटण्याचा प्रकार घडला होता. यातील एक संशयित गौरव घोटेकर यास पोलिसांनी पळून जाताना ताब्यात घेतले होते.

त्याच्या तीन फरार साथीदारांचा तपास लागलेला नसताना गुन्हा घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी जामिनावर सुटलेला गौरव अवैध हत्यारे बाळगण्याच्या गुन्ह्यात पुन्हा जेरबंद झाला आहे. मुळातच बनावट पोलीस प्रकरणात रस्तालुटीसारख्या गुन्हयाची नोंद होणे अपेक्षित होते.

इतर संशयित फरार असताना पकडलेल्या गुन्हेगाराचा न्यायालयात तातडीने जामीन होऊन त्याची सुटका झाल्याचा प्रकार वावी परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांची कार्यपद्धती गुन्हेगारांना अभय देणारी असल्यानेच परिसरात गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. वरिष्ठांनी अशा घटनांमध्ये लक्ष घालून जनतेला दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Nashik Crime News
वणी ग्रामिण रुग्णालय बनले 'रेफर' केंद्र; आदिवासी रुग्णांची होतेय गैरसोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com