अफगाणिस्तान व्यापार बंदी : फार्मासह कृषी प्रक्रिया उद्योगावर परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pharma agro

अफगाणिस्तान व्यापार बंदी : फार्मासह कृषी उद्योगावर परिणाम

सातपूर (नाशिक) : कोरोनाच्या संकटातून (coronavirus) अजून नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील (nashik) उद्योग सावरत नाही, तोच अफगाणिस्तानमधील (afganistan) अस्थिर परिस्थितीमुळे भारतातील निर्यातीवर बंदी आणल्याने महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग, कृषी तसेच फार्मा कंपन्यांवर याचा गंभीर परिणाम होणार आहे, अशी माहिती नाशिक एक्स्पोर्ट कमेटीचे अध्यक्ष एन. डी.ठाकरे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

फार्मासह कृषी प्रक्रिया उद्योगावर परिणाम

जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात भारतातील महाराष्ट्रासह अनेक राज्यातील विविध क्षेत्रातील उद्योग आपले चाके रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत असताना अचानक अफगाणिस्तानमध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्याने यामुळे तूर्तास उत्तर महाराष्ट्रातील मशिनरी निर्माण करणाऱ्या इंजिनिअरिंग, कृषी तसेच कॉस्मेटीक व फार्मा क्षेत्रातील अनेक उद्योगावर याचा परिणाम जाणवणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे पाकिस्तानबाबत ही अशीच अस्थिर परिस्थिती असल्याने एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्या सावध पवित्रा घेताना दिसत आहे.

हेही वाचा: नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस नव्या चेहऱ्यांच्या शोधात!

हेही वाचा: नाशिक : गडकरींच्या 'त्या' ट्विटनंतर भाजप-शिवसेनेत श्रेयवाद!

Web Title: Afganistan Crisis Impact On Agro Processing Pharma Industry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :pharma sector