African Swine Fever
sakal
नाशिक: महापालिकेच्या विल्होळी खत प्रकल्पाच्या परिसरात मृत आढळलेल्या वराहांचे नमुने भोपाळच्या हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबोरेटरीकडून प्राप्त झाले असून, आफ्रिकन स्वाइन फीवरचे नमुने मृत वराहांध्ये आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार बाधित क्षेत्र घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.