
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवार आणि अंदरसूल उपबाजार आवारात १२ दिवसांनंतर कांदा तसेच भुसार धान्याचे लिलाव सुरू झाले.
येवला (जि. नाशिक) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवार आणि अंदरसूल उपबाजार आवारात १२ दिवसांनंतर कांदा तसेच भुसार धान्याचे लिलाव सुरू झाले. दिवसभरात ६६२ ट्रॅकटरमधून आलेल्या सुमारे १२ हजार क्विंटल कांद्याचा लिलाव झाला. दिवसभरात बाजार समितीच्या येवला मुख्य आवारात १९४ शेतकऱ्यांची, तर अंदरसूल उपबाजार आवारात ८२ शेतकऱ्यांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट (Rapid Antegin Test) करण्यात आली. (After 12 days of close onion and grain auctions started in Yeola market)
लिलावासाठी सोमवारी सकाळीच मनमाड-नगर महामार्गावर पहाटेपासूनच ट्रॅक्टरची मोठी रांग लागली होती. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच कोरोना चाचणी अहवाल तपासून वाहने आवारात सोडण्यात येत होती. येवला आवारात ५०० ट्रॅक्टर व उपबाजार आवार अंदरसूल येथे १६२ कांदा ट्रॅक्टर वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार सकाळी सहापासून कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल करण्यात आले. आवारात प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शारीरिक तापमानाची नोंद तसेच वाहन सॅनिटाइझ करून आत प्रवेश देण्यात आला. बाजार समिती आवारात प्रत्येक वाहनात तीन फुटांचे अंतर ठेवून वाहने उभी करण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, मुख्य प्रशासक वसंत पवार, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील, बी. आर. लोंढे, सचिव कैलाश व्यापारे आदींनी लिलाव सुरळीत सुरू करण्यासाठी उपस्थित राहून सूचना केल्या, तर तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. शैलजा कुप्पास्वामी, डॉ. शरड कातकाडे, डॉ. मेहते, डॉ. पालवे तसेच शहर पोलिस निरीक्षक संदीप कोळी व पोलिस प्रशासनाचे सहकार्य लाभले.
बाजार समितीच्या मुख्य आवारात ५०० ट्रॅक्टरमधून नऊ हजार क्विंटल कांदा आवक झाली. अंदरसूल उपबाजार आवारात १६२ वाहनांतून तीन हजार क्विंटल कांदा आवक झाली. बाजारभाव किमान ५०० ते कमाल १६०० रुपये, तर सरासरी एक हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल होते. कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, सचिव के. आर. व्यापारे व प्रशासक मंडळाने केले आहे. कांदा विक्रीसाठी आदल्या दिवशी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आदल्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत मुख्य आवार येवलासाठी मोबाईल क्रमांक ९४२१५६३७६७, ९४२३१८३४५९ व ९९७०११३४०९ तसेच उपबाजार अंदरसूलसाठी मोबाईल क्रमांक ९४२३४७८११३, ९४२३४७८१४१ व ९८८१९१५२१७ वर नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
(After 12 days of close onion and grain auctions started in Yeola market)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.