Nashik News : 7 दिवसानंतर मिनी मंत्रालय गजबजले! बांधकाम, लेखा विभागात देयके काढण्यासाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP Nashik

Nashik News : 7 दिवसानंतर मिनी मंत्रालय गजबजले! बांधकाम, लेखा विभागात देयके काढण्यासाठी गर्दी

नाशिक : सात दिवसांच्या संपानंतर शासकीय कर्मचारी मंगळवारी (ता.२१) कामावर रुजू झाले. त्यामुळे नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेसह सरकारी कार्यालये पुन्हा गजबजली. प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे सुरू झाले.

तालुका, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील संपातील कर्मचारी हजर झाल्याने विस्कळित झालेली रुग्ण सेवा पूर्ववत झाली. जिल्हा परिषद कार्यालयात झालेल्या कामांची देयके काढण्यासाठी तसेच विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (After 7 days of employees strike Rush to collect payments in construction accounting department Nashik Zp News)

जुनी पेन्शन सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती सरकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गीय संघटनेच्या नेतृत्वाखाली १४ मार्चपासून कर्मचारी संपावर होते.

जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व निगडित आस्थापनांद्वारे सुमारे १७ हजार कर्मचारी संपात सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर, चतुर्थ श्रेणी, महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत कर्मचारी यांचा समावेश यामध्ये होता.

परिणामी प्रशासकीय कामकाज ठप्प राहिले. अत्यावश्यक सेवेत सामावेश असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना संपावर नव्हते. कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने आरोग्य सेवा विस्कळित झाली. रुग्णांना तातडीने सेवा मिळण्यात अडचणी आल्या. किरकोळ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

सोमवारी सायंकाळी उशिरा मुंबईत संप मागे घेत असल्याची घोषणा झाली. त्यानंतर मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, आरटीओसह सर्वच विभागातील संपातील सर्व कर्मचारी हजर झाले. नेहमीप्रमाणे कार्यालयाच्या कामकाजाला सुरवात झाली.

सर्वच कक्ष अधिकारी, लिपिकांच्या टेबलांवर प्रलंबित फायलींचा ढीग होता. त्याचा निपटारा करीत तातडीच्या कामाला प्राधान्य दिले देण्यावर कर्मचाऱ्यांनी भर दिला. सात दिवसानंतर कामकाज सुरू झाल्याने विविध कामानिमित्त आलेल्या लोकांची सर्वच कार्यालयात गर्दी झाली होती.

कामानिमित्त आलेल्या लोकांना सात दिवस संप होता, त्यामुळे तुमच्या कामास विलंब होईल, असे सांगितले जात होते. आवक जावक कक्षात टपालांचा ढीग होता. प्रत्येक टपाल नोंदवून संबंधित विभागात पाठवण्यात कर्मचारी व्यस्त होते.

जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासूनच लोकप्रतिनिधी, ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांची गर्दी बघायला मिळाली. जिल्हा परिषदेमध्ये सध्या मार्च एन्डिंगचा फिव्हर असल्याने बिले देण्याची कामे सुरु आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....