esakal | नाशिककरांनी अनुभवला थरार! गंगापूररोडला भरवस्‍तीत बिबट्या जेरबंद, पाहा VIDEO
sakal

बोलून बातमी शोधा

Leopards seized in Nashik

नाशिककरांनी अनुभवला थरार! गंगापूररोडला भरवस्‍तीत बिबट्या जेरबंद, पाहा VIDEO

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : भरवस्‍ती असलेल्‍या गंगापूररोड परीसरातील नागरीकांनी पुन्‍हा एकदा बिबट्याचा थरार अनुभवला. येथील नरसिंह नगर भागात रविवारी (ता.१८) सकाळी सव्वा आठच्‍या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. कोरोनाचे सावट असतानाही परीसरातील नागरीकांनी बिबट्याच्‍या दर्शनासाठी गर्दी केली होती.

नरसिंहनगर परीसरात बिबट्यामुळे तीन ते सव्वा तीन तास थरार सुरु राहिला. भरवस्‍तीचा परीसर असल्‍याने एका सोसायटीतून दुसर्या सोसायटीत झेप घेत बिबट्या वनविभागाच्‍या अधिकार्यांना चुकवत होता. त्‍यामूळे बिबट्याचा नेमका ठाव घेण्यात वनविभाग कर्मचार्यांची दमछाक होत होती. बिबट्याची स्‍थान निश्‍चिती झाल्‍यानंतर डार्टच्‍या सहाय्याने त्‍याला बेशुद्ध करण्याचे प्रयत्‍न सुरु झाले. पहिल्‍या दोन वेळा मारलेल्‍या डार्टपासून बिबट्या बचावला. मात्र तिसरा डार्ट बसल्‍याने तो बेशुद्ध झाला.

हेही वाचा: माणुसकीच नव्हे, संवेदनाही हरपल्या! बिलासाठी घेतल्या मृत महिलेच्या बांगड्या

वनविभागाचे अधिकारी जखमी

इमारतीमध्ये लपून बसलेल्‍या बिबट्याच्‍या शोधार्थ वनविभागाचे पथक, या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक मिडीया प्रतिनिधी अशी मोठी गर्दी बघून बिबट्या चवताळला होता. घटनास्‍थळाहून पळ काढण्याच्‍या प्रयत्‍नात असतांना बिबट्याने वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्‍यावर हल्‍ला करण्याचा प्रयत्‍न केला. यात बिबट्याचा पंचा त्‍यांच्‍या पोटरीला लागल्‍याने ते किरकोळ जखमी झाले.

कोरोनाची भिती झुगारुन, नागरीकांनी केली गर्दी

सध्या राज्‍यासह जिल्‍ह्‍यात संचारबंदी लागू आहे. असे असतांना बिबट्याला बघण्यासाठी परीसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. सर्व नियम झुगारुन नागरीक घटनास्‍थळी ठाण मांडून होते. पोलिसांकडून वारंवार सूचना करूनही गर्दी घटत नसल्‍याने, कोरोनाच्‍या प्रादुर्भावाची भिती या ठिकाणी निर्माण झाली होती.

हेही वाचा: अंत्यसंस्कारासाठी कोळसा वापरण्याची वेळ! वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव