नाशिक : कोरोनानंतर शहरात दुकानदारही झाले रिलॅक्स

after corono situation
after corono situationesakal

नाशिक : कोरोना (Corona) काळात दोन वर्षे व्यवसायांची घडी विस्कटली, पण सोबतच अनेक दुकानदारांच्या पारंपरिक सवयी पार बदलून गेल्या आहेत. कधी काळी सकाळी साडेनऊपासून उघडणारी दुकान आता सकाळी अकरापर्यंत यशावकाथ उघडतात. दोन वर्षात अनेक दिवस दुकानच बंद असल्याने या काळात दुकानदारांची बदललेली सवय आता सगळ्या मार्केटची सवय बनली आहे. त्‍यातून काही नवे प्रश्न पुढे येऊ लागले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे हे निरीक्षण आहे.

कोरोना (Coronavirus) महामारी सुरू होईपर्यंत शहरात सकाळी आठ ते साडेआठ पासूनच दुकान उघडली जातात. नऊ, दहापासून बाजार फुलायला लागला. सहाजिकच घंटागाडी येईपर्यंत अनेक दुकानांचा कचरा संकलन होऊन रस्त्यालगत पाहायला मिळत. मात्र, मध्यतंरी कोरोना काळात उद्योग व्यवसायाचे पुरते बारा वाजले. अनेक दिवस दुकानच बंद होती. त्यानंतर हळूहळू कोरोना महामारीतून सावरताना उद्योग व्यवसाय पुन्हा पूर्ववत होऊ लागले. पण सुरवातीला अनेक महिने ग्राहकांनी पाठ फिरविली होती. कोरोनात ऑनलाइन खरेदीसह अनेक नव्या सवयीमुळे बाजारातील गर्दीवर त्याचा चांगला परिणाम झाला. हळूहळू हीच सवय आता दुकानदार व्यावसायिकांच्या अंगवळणी पडली आहे.

कचऱ्याचे ढीग

महापालिकेतर्फे (nmc) कचरा संकलनासाठी सकाळ सत्रात घंटागाड्या धावतात. मात्र, काही दिवसांपासून या घंटागाड्यांना कचरा संकलनाला प्रतिसादच मिळत नसल्याचे या विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सकाळ सत्रातील घंटागाड्यात जातात, पण अनेक दुकानच उघडली जात नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे कचरा संकलन होत नाही. कचरा संकलनासाठी घंटागाड्या येऊन गेल्यानंतर हळूहळू दुकान उघडतात. त्यानंतर सोयीनुसार दुकानदार व्यावसायिकांकडून दुकानांतील कचरा संकलन होते आणि मिळेल त्या ठिकणी कचरा फेकला जातो. असे काही महिन्यापासूनच आरोग्य विभागाच्या पथकांचे निरीक्षण आहे.

after corono situation
राज्यात तूर्तास मास्क सक्ती नाही : राजेश टोपे

कारवाईची मागणी

उशिरा दुकान उघडून इतर दुकानदारांच्या दुकानाच्या आसपास कचरा टाकण्याच्या घटना वाढत आहे. दुपारी उशिरापर्यंत कुठेही कचरा फेकून देण्याच्या या प्रकाराकडे महापालिका आरोग्य विभागाकडून (Municipal Health Department) डोळेझाक होते. त्यामुळे उघड्यावर कचरा फेकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी आहे.

after corono situation
Kids Vaccination : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले...

शहरातील स्वच्छता तसेच कुठेही घाण राहू नये याची काळजी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून घेतली जाते. आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावतात. मात्र त्यानंतर बाजारात रस्त्यालगत दुकानातील कचरा फेकल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

- डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com