esakal | वर्षा बंगल्यावरील चर्चेनंतर गिते, बागुलांची निश्चिती; संजय राऊतांवर सोपविला निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

sunil bagul, gite, raut.jpg

एकेकाळचे शिवसैनिक व सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले वसंत गिते व सुनील बागूल या दोघांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उशिरा भेट घेतली. चर्चेतून दोघांच्या घरवापसीला सिग्नल देण्यात आला; परंतु प्रवेशाच्या मुहूर्ताबाबत अनिश्चितता ठेवण्यात आली.

वर्षा बंगल्यावरील चर्चेनंतर गिते, बागुलांची निश्चिती; संजय राऊतांवर सोपविला निर्णय 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : एकेकाळचे शिवसैनिक व सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले वसंत गिते व सुनील बागूल या दोघांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उशिरा भेट घेतली. चर्चेतून दोघांच्या घरवापसीला सिग्नल देण्यात आला; परंतु प्रवेशाच्या मुहूर्ताबाबत अनिश्चितता ठेवण्यात आली. गिते व बागूल यांचा सर्वस्वी निर्णय खासदार राऊत यांच्यावर सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

वर्षा बंगल्यावरील चर्चेनंतर गिते, बागुलांची निश्चिती

विविध कार्यक्रमांचे निमित्त साधून शहरात आलेल्या खासदार संजय राऊत यांनी भाजपमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले. शुक्रवारी (ता. ८) माध्यम प्रतिनिधींशी या विषयावर ते मत मांडणार आहेत. राऊत यांचा संभ्रम निर्माण करण्याचा स्वभाव लक्षात घेता भाजप नेत्यांकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आली नसून अद्यापही गिते, बागूल प्रवेश करणार नसल्याचा दावा केला जात आहे. एकेकाळचे शिवसेनेचे आधारस्तंभ असलेले वसंत गिते व सुनील बागूल या दोघांनाही शिवसेनेचे वेध लागले आहेत. गिते यांना मध्य विधानसभेसाठी सुरक्षित मतदारसंघ वाटतो, तर बागूल यांना श्रमिक सेना पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेना हाच एकमेव पर्याय वाटतो. त्यामुळे अन्य पक्षांत दोघांचेही मन कधी रमले नाही.

हेही वाचा >  डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना

खासदार राऊत यांच्यावर सोपविला निर्णय 

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर गिते व बागूल या दोघांनीही शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला आहे. गिते यांनी स्वतःहून शिवसेना सोडत ते मनसे व भाजपमध्ये स्थायिक झाले होते, तर बागूल यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पडतीच्या काळात दोघांचा शिवसेनेला झालेला उपद्रव लक्षात घेता त्यांना पक्षात स्थान दिले जाईल की नाही याबाबत साशंकता होती; परंतु आता शिवसेनेने पक्षवाढीसाठी धोरण बदलल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गिते व बागूल यांची घरवापसी करण्यास पक्षनेतृत्वाने हिरवा कंदील दिल्याचे बोलले जात आहे. गिते व बागूल या दोघांनीही बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याचे समजते. गुरुवारी दिवसभर गिते, बागूल यांचे मोबाईल स्विचऑफ होते. 

हेही वाचा > मैत्रीत मोठा घात! मित्राच्याच डोक्यात घातला मोठा दगड; नशेत सांगितली धक्कादायक आपबिती


प्रवेश लांबण्याची शक्यता 
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर चर्चेची दुसरी फेरी खासदार राऊत यांच्याशी होणार असल्याचे बोलले जात आहे. दोघांनी शिवसेना सोडली त्या वेळी राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राऊत यांच्यावर दोघांना पक्षात घेण्याची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रवेश निश्चित झाला असला तरी लांबणीवर पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.  

loading image