दिवाळीनंतर नाशिक शहरात स्मार्ट पार्किंगवर शुल्क वसुली

parking
parking esakal
Updated on

नाशिक : स्मार्टसिटीअंतर्गत शहरात उभारण्यात आलेल्या ऑन स्ट्रीट व ऑफ स्ट्रीट पार्किंगवर दिवाळीनंतर शुल्क वसुली केली जाणार आहे. दरम्यान, ट्रायजेन कंपनीने तीन वर्षे मुदतवाढीसह शुल्कवाढीचा प्रस्ताव स्मार्टसिटी कंपनीसमोर ठेवल्याने वाढीव शुल्काबाबत प्रशासन काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पार्किंग शुल्कवाढीला मान्यता दिल्यास त्यावरून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

असा असेल पार्कींगचा दर

शहरामध्ये स्मार्टसिटीअंतर्गत पीपीपी तत्त्वावर पार्किंग प्रकल्प राबविण्यात आला आहे. यात २८ ऑन स्ट्रीट, तर ५ ऑफ स्ट्रीट, असे एकूण ३३ पार्किंगच्या जागा निश्चित करण्यात आल्या. ट्रायजेन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत पार्किंग शुल्क वसुली केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये बावीस पार्किंगचे लॉट्स सुरू केले जाणार असून, कंपनीला दहा वर्ष दुचाकी वाहनांसाठी प्रतितास १५ तर चार चाकी वाहनांसाठी तीस रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. आकारण्यात आलेले पार्किंगचे दर अधिक असल्याने दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुचाकीसाठी प्रतितास पाच रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी प्रतितास दहा रुपये, असा दर ठरवून देण्यात आला.

parking
पहिला लक्षवेधी सामना बडगुजर V/S शहाणे

ट्रायजेन कंपनीकडून त्यानंतर शुल्क वसुली सुरू केली होती, मात्र मार्च २०२० मध्ये कोरोना साथ सुरू झाल्याने शुल्क वसुली थांबवण्यात आली. अद्यापपर्यंत स्मार्ट पार्किंगवर शुल्क वसूल केले जात नाही. दरम्यान, आता ट्रायजेन कंपनीने स्मार्टसिटी कंपनीकडे पत्रव्यवहार करत अटी ठेवल्या आहेत. त्यात पार्किंग शुल्क वसुलीला तीन वर्षांची मुदतवाढ, तसेच संपूर्ण शहरात टोइंग व्हॅन सक्तीची करावी अशी अट टाकण्यात आली आहे. दरम्यान, दिवाळीनंतर शहरात पार्किंगवर शुल्क वसुली सुरू होणार असल्याची माहिती स्मार्टसिटी कंपनीकडून देण्यात आली. कंपनीने प्रतितास दुचाकीसाठी १५, तर चारचाकी वाहनांसाठी प्रतितास तीस रुपये शुल्क आकारण्याची मागणी केली आहे. त्यावरदेखील दिवाळीनंतर निर्णय घेतला जाणार असून नागरिकांचा शुल्क वाढीला विरोध आहे.

parking
अठरा जागांसाठी अठरा हजार तरुणांची हजेरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com