Nashik News: नळवाडपाडा दुर्घटनेची चौकशी करुन मदतीचा प्रस्ताव शासनास सादर

Nalvadpada tragedy
Nalvadpada tragedyesakal

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा, ता. दिंडोरी शिवारात काल, ता. ७ रोजी झालेल्या दुर्घटनेची प्रशासकीय पातळीवर चौकशी करुन पंचनामा करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्तांना शासकीय मदतीसाठीचा प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठविला असल्याची माहिती तहसिलदार पंकज पवार यांनी दिली आहे. (after investigating Nalvadpada tragedy proposal for help submitted to government Nashik News)

नळवाडपाडा, ता. दिंडोरी शिवारात इंडो फ्रेंच कंपनीची जुने स्लॅबचे खोली होती. या खोलीत गुलाब वामन खरे हे गेल्या १०-१२ वर्षांपासून वास्तव्यास होते.

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या नळवाडा व परीसरात झालेल्या अतिवृष्टीत गुरुवार, ता. ७ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गुलाब वामन खरे यांचे वास्तव्यात असलेले सदरच्या खोलीचा स्लॅब कोसळून गुलाब खरे यांच्यासह तीन वर्षीय नातू निशांत विशाल खरे यांचा स्लॅब अंगावर पडून जागीच मृत्यु झाला होता.

तर आई विठाबाई खरे यांना वाचविण्यात ग्रामपंचायीचे सरपंच, कर्मचारी यांच्या मदतीने प्रशासनास यश आले होते.

सदर घटनेची सामाजिक कार्यकर्ते सम्राट पगारे यांनी दिंडोरीचे तहसिलदार यांना पहाटे १ वाजेच्या सुमारास माहिती दिल्यानंतर तहसिलदार पवार यांनी मंडळ अधिकारी अमोल ढमके, ग्रामसेविका ललीता खांडवी लागलीच घटनास्थळी शासकीय वाहानाने रवानगी करुन मदत कार्यासाठी सरपंच हिरामण गवळी यांच्या मदतीने जेसेबी बोलावून मदत कार्य करीत मृतांना स्लॅबखालून काढण्या बरोबरच विठाबाई खरे यांना वाचविण्यात कर्तव्य बजावले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nalvadpada tragedy
Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती यांचा भावी 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख! स्वराज्यची राजकीय योजना काय?

दरम्यान तहसिलदार पंकज पवार यांच्या आदेशाने मंडल अधिकारी अमोल ढमके तलाठी गिरीश बोंबले, ग्रामसेविका ललिता खांडवी यांनी काल, ता. ८ रोजी घटनास्थळाचा पंचनामा करीत दुर्घटनाग्रस्त खरे कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

"सदरची घटनेची पहाटे १ वाजता फोनद्वारे माहीती मिळाल्यानंतर मंडल अधिकाऱ्यांना शासकीय वाहन देऊन अवघ्या तासात शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. घटना दुर्दैवी आहेच, मात्र अडकलेल्या आजींना वाचविण्यात यश आल्याचे समाधानही आहे. सदर घटनेचा पंचनामा करुन मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे."

- पंकज पवार, तहसिलदार दिंडोरी

Nalvadpada tragedy
Nashik Rain Update: दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर ओसरला; वाघाड धरण झाले ओव्हरफ्लो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com