
गरमी में ठंडी का एहसास; तरण तलावात जलतरणपटूंसह हौशींची गर्दी
नाशिक रोड : निर्बंध शिथिल झाल्याने राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरण तलावात (Rajmata Jijau International Swimming Pool) जलतरणपटूंसह हौशींची गर्दी झाली. दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्वच ठिकाणी निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, जसजसा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत चालला तसे टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून, आता संपूर्ण निर्बंधमुक्तीचा आनंद घेतला जात आहे.
शहरातील बंद असलेले तरण तलाव मंगळवार (ता. १९) पासून खुले करण्यात आले असून, जलतरणपटूंनी दोन दिवसांपासून ‘गरमी में ठंडी का एहसास’ याप्रमाणे तलावात यथेच्छ डुंबण्याचा आनंद लुटला. नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरण तलावात जलतरणपटूंसह हौशींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. दोन वर्षांपासून तरण तलाव बंद असल्याने जलतरणपटूंचा हिरमोड झाला होता. मात्र, निर्बंध पूर्णपणे शिथिल केल्यानंतर सर्व तलाव खुले करण्यात आले आहेत. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने या तरण तलावात पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येते. या तलावाचा दर्जा व गरज लक्षात घेतल्यास मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध केल्यास अधिक चांगल्या दर्जाची सेवा नागरिकांनी देता येईल. प्रशिक्षित कोचेस उपलब्ध केल्यास दर्जेदार खेळाडू घडतील, असे काही जलतरणपटूंनी सांगितले.
हेही वाचा: नाशिक : मुख्यमंत्री रविवार जिल्हा दौऱ्यावर
नाशिक रोडचा हा तलाव खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. दिल्लीतील तालकोटरानंतर एवढा आधुनिक तलाव देशात कोठे नसल्याचा दावा केला जात आहे. एवढ्या दर्जेदार तलावासाठी पुरेसे मनुष्यबळ, प्रशिक्षक, सुविधा असणे गरजेचे आहे.
हेही वाचा: रुग्णवाहिका दारात असूनही गर्भवतीची अवहेलना | Nashik
महिलांसाठी बंदिस्त तलाव
या तलावात गरिबांपासून उच्चवर्गीय नागरिक, लहान मुले येतात. महिलांसाठी बंदिस्त तलाव आहे. उन्हाळ्यामुळे नागरिकांची खास करून लहान मुलांची गर्दी वाढली आहे. डायव्हिंग तलावावर डायव्हिंग बोर्ड तसेच लिफ्टची सुविधा आहे. या तलावाची स्वच्छता, मार्गदर्शन चांगले असल्याने नागरिकांची गर्दी असते. नाशिक रोडसह इगतपुरी, मनमाड, सिन्नर, पळसे, शिंदे येथून नागरिक येथे येतात.
Web Title: After Pandemic Crowds Of Swimmers At The Rajmata Jijau International Swimming Pool Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..