Nashik News : सरपंचानंतर आता उपसरपंचांच्या निवडणुकीकडे नागरिकांच्या नजरा; सोमवारी होणार निवडीचे घोषणा

Gram Panchayat
Gram Panchayatsakal

सिन्नर (जि. नाशिक) : सरपंचांची निवड थेट जनतेतून पार पडली असून, तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांमधून उपसरपंचाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी होणार आहे. ही निवड होत असताना सध्या आपल्या गटाचा उपसरपंच व्हावा, यासाठी गावोगावी प्रत्येक गट प्रयत्न करत आहे.

त्यामुळे सदस्य फोडाफोडी, पळवापळवी तर दुसरीकडे स्वताचे सदस्य सुरक्षित ठेवण्याचे काम ग्रामपंचायत महिला आरक्षण ५० टक्के असल्यामुळे निम्म्या ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज पॅनलप्रमुखांना करावे लागत आहे. (After sarpanch citizens now looking at election of deputy sarpanch Election will be announced on Monday Nashik News)

ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यावेळी उपसरपंच सध्या तरी रस्सीखेच ग्रामपंचायतींमध्ये सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे .' सरपंच थेट जनतेतून निवडून आले. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडी आटोपल्या आहेत. आता सदस्यांमधून उपसरपंचपदाच्या निवडी पार पडणार आहेत. उपसरपंचपदासाठी सदस्यांमधील अनेक इच्छुक आपापल्या पद्धतीने प्रयत्न करित आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य आपल्या बाजूने कसे येतील, त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

मात्र, सदस्य फोडून स्वतःच्या गटात सामील करून घेण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आपल्या गटातील सदस्य फुटू नयेत, यासाठी अनेक ग्रामपंचायतींच्या पॅनलप्रमुखांनी आपले सदस्य अज्ञातस्थळी हलविण्याची तयारी सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी होऊ शकते. त्यामुळे त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी चुरस होणार आहे.

उपसरपंचपदासाठी इच्छुक असणारे उमेदवार तसेच पॅनलप्रमुख घेत आहेत. त्यातच ग्रामपंचायत सदस्यांची संख्या विषम जरी असली तरीही सरपंचपद धरून सम संख्या होत आहे. जनतेतून निवडून गेल्यानंतर सरपंच झालेल्यांना उपसरपंचपदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजानात येणार आहे त्यामुळे अनेक गावात चुरस निर्माण भगव्यास मिळत आहे

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Gram Panchayat
Agniveer News: दुश्मनकी सेना देंगे चीर, हम है अग्निवीर! पहिल्या तुकडीला तोफखान्यात प्रशिक्षण

सरपंचांच्या मतदानामुळे लागणार अनेकांची वर्णी

एखाद्या गटाचे पाच सदस्य निवडून आले व दुसऱ्या गटाचे चार सदस्य निवडून आले असतील तर अशा परिस्थितीत सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवारांनी आपले मत चार सदस्य असणाऱ्या बाजूने टाकले तर अशा ठिकाणी पाच-पाच अशी समसमान संख्या होते. अशा वेळी पुन्हा एकदा सरपंचांना अतिरिक्त मत देण्याचा अधिकार आहे.

या अतिरिक्त मताचा अधिकार वापरून सरपंच पुन्हा एकदा चार सदस्य संख्या असणाऱ्या बाजूने उपसरपंचपदासाठी मत टाकू शकतो. अशा वेळी सदस्य म्हणून निवडून आलेल्या पाच जणांच्या गटापेक्षा चार जणांचा गट हा सरपंचामुळे ताकदवान होत आहे.

Gram Panchayat
Nashik News : नांदगावला आहार मदतनीस कर्मचाऱ्यांचा ठिय्या; 7 महिन्यापासून थकले आहार अनुदान!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com