Nashik News : श्री शिवपुराण कथेनंतर मालेगावच्या बसस्थानकात उसळला प्रवाशांचा जनसागर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crowd of passengers at the bus station here.

Nashik News : श्री शिवपुराण कथेनंतर मालेगावच्या बसस्थानकात उसळला प्रवाशांचा जनसागर!

नाशिक : येथील मसगा महाविद्यालयाच्या मैदानात श्री शिव महापुराण कथेचा गुरुवारी (ता.२९) दुपारी समारोप झाला. महापुराण कथेचा शेवटचा दिवस असल्याने येथे भाविकांचा जनसागर उसळला होता. दुपारनंतर सात दिवसापासून मालेगाव मुक्कामी असलेले भाविक घराकडे परतले. दुपारी एक ते सहा यावेळेत येथील नवीन बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप आले होते.

एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने बसेस कमी पडल्या. आलेले भाविक मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी जाण्यासाठी गर्दी करीत होते. येथील मातोश्री चालक मालक संघटनेने ६५ ट्रक उपलब्ध करून शिव भक्तांना मोफत त्यांच्या गावी पोहचविण्याची व्यवस्था केल्याने बसेसचा भार हलका झाला. (After Shivpuran katha crowd passengers at Malegaon bus station Nashik News)


हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: 31st Celebration : तळीरामांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची राहणार करडी नजर!

भाविकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी पालकमंत्री दादा भुसे व स्वयंसेवक मदत करीत होते. महिला प्रवाशांना प्राधान्याने बसेस मध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येत होती. जळगाव, धुळे, पाचोरा, साक्री, नंदुबार, नाशिक, मध्यप्रदेश, यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरीकांनी बस स्थानकावर गर्दी केली होती. बसस्थानकात प्रवाशांचा ओघ सुरूच होता.

शहरातील सटाणा नाका, एकात्मता चौक, मोसमपुल, नवीन बस स्थानक ते दरेगाव पर्यंत व मोसम पुल ते मनमाड चौफुलीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. बसस्थानकात मालेगाव डेपोतील १६५ बसेस सोडण्यात आल्या होत्या. गर्दी कमी होत नसल्याने येथील मातोश्री चालक मालक संघटनेतर्फे ६५ ट्रक व आयशर उपलब्ध करून दिल्या.

"पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे,चाळीसगाव,कळवण, देवळा येथे जाणाऱ्या भाविकांसाठी ६५ ट्रक व आयशर मोफत उपलब्ध करून दिले. भाविकांना सुखरुप त्यांच्या गावी सोडण्यात आले आहे." - सुनील चांगरे, शहराध्यक्ष मातोश्री चालक मालक संघटना

हेही वाचा: Mission Zero Dropout : वीटभट्टीवरील स्थलांतरित मुले शिक्षणाच्या प्रवाहात!

टॅग्स :MalegaonNashikBus Stand