Nashik News : गोळीबाराच्या घटनेनंतर सातपूरचा पदभार पुन्हा चव्हाण यांच्याकडे

वरिष्ठ दर्जाचा अधिकारीच नसल्याची पोलिस वर्तुळात चर्चा
fire by pistol
fire by pistolesakal

नाशिक : सातपूरमध्ये रविवारी (ता. १९) भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी पुन्हा सातपूर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी महेंद्रकुमार चव्हाण यांची वर्णी लागली आहे.

विशेषतः काही दिवसांपूर्वीच सातपूर हद्दीतील आर्थिक व्यवहाराच्या तक्रारींवरून चव्हाण यांच्यासह एका पोलिस निरीक्षकाची पोलिस आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली होती.

मात्र, काही दिवसांत पुन्हा चव्हाण यांची त्याच पोलिस ठाण्यात वर्णी लागल्याने आयुक्तालयात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी नाही का, अशी चर्चा पोलिस वर्तुळातच सुरू झाली आहे. (After shooting incident charge of Satpur again to PI mahendrakumar Chavan Nashik News)

सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये रविवारी (ता. १९) भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलिसांत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी सातपूर पोलिसांच्या पथकांसह शहर गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आलेली आहेत.

तर सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून पुन्हा महेंद्रकुमार चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे सातपूरकरांना आश्‍चर्याचा धक्काच बसला आहे. काही दिवसांपूर्वीच सातपूर हद्दीतील वाढती गुन्हेगारी आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात तक्रारी पोलिस आयुक्तालयाकडे आल्या होत्या.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

fire by pistol
Crime News : धक्कादायक! मध्यरात्री स्वतःलाच श्रद्धांजली वाहून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

त्याची गंभीरपणे दखल घेत, पोलिस आयुक्तांनी चव्हाण यांच्यासह पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर यांची तडकाफडकी बदली केली होती. तर, सातपूरसारख्या पोलिस ठाण्याची जबाबदारी जबाबदार अधिकाऱ्याकडे न देता, सहाय्यक निरीक्षकांकडे सोपविली होती. त्यामुळे आयुक्तालयातील अनेकांना या पोलिस ठाण्याची जबाबदारी मिळण्याची अपेक्षा होती.

परंतु पुन्हा चव्हाण यांचीच नियुक्ती केल्याने अनेकांचे प्रयत्न फोल ठरले आहेत, तर दुसरीकडे अवघ्या काही दिवसांतच हटविण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची नामुष्कीच पोलिस आयुक्तालयावर ओढवल्याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे. विशेषतः याच सातपूर हद्दीमध्ये गेल्या वर्षी भरदिवसा दरोड्याची घटना घडली होती. त्या गुन्ह्याची उकल अद्याप होऊ शकलेली नाही.

fire by pistol
Jalgaon Crime News: खिडकी तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश अन् कपाट तोडून दागिने लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com