गॅस सिलेंडरचे दर कमी करावे यासाठी मोदींच्या प्रतिमेचे औक्षण; राष्ट्रवादीचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agitation from NCP to reduce price of gas cylinders

गॅस सिलेंडरचे दर कमी करावे यासाठी मोदींच्या प्रतिमेचे औक्षण

नाशिक : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेल्या एक्साइज करात तुटपुंजी कपात केली परंतु गॅस सिलेंडरचे दर जैसे थे असल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सोनिया होळकर यांनी नाराजी व्यक्त करत भाऊबीज निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रतिमेचे औक्षण करत केले आंदोलन केले.

गॅस सिलेंडरच्या दराकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष

मोदी (Narendra Modi) सरकार डिझेलवर १० रुपये आणि पेट्रोलमध्ये ५ रुपये कर कपात करत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु गॅस सिलेंडरच्या दरात कपात न केल्याने सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडून निघाले आहे. सततच्या इंधन दरवाढी मुळे सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डीझेल व गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे जनता केंद्र सरकारचा कडाडून विरोध करत आहे. या भीती पोटी आपण जनतेच्या बाजूने असल्याचे चित्र दाखविण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या किमतीत तुटपुंजी कपात केली. परंतु यामागचे खरे कारण दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीचा पराभव असून आलेल्या निकालानंतर केंद्र सरकार घाबरल्याने भीतीपोटी दर कपात केली आहे. पेट्रोल-डीझेलचे दर कमी करताना गॅस सिलेंडरच्या दराकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने भाऊबीजेनिमित्त त्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचे औक्षण करत उपहासात्मक आंदोलन करत असून भाऊबीजेनिमित्त तरी गॅस सिलेंडरचे दर कमी करावे युवती शहराध्यक्ष सोनिया होळकर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: नाशिक : तुषार भोसले यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडवणीसांची सरप्राईज भेट

यावेळी जिल्हाध्यक्ष किशोरी खैरनार, ऐश्वर्या गायकवाड, दीपाली अरिंगळे, रिटा भक्कड, कल्याणी बच्छाव, काजल खैरनार, विद्या रिजल, कादंबरी वैष्णव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : रेल्वेची आरक्षण मर्यादा संपली; प्रवाशांचे हाल

Web Title: Agitation Of Ncp To Reduce Gas Cylinders Price Using Pm Modi Photo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..