Agniveer Recruitment : पाडळीतील 8 तरुण सैन्य दलात भरती; गावातील तरुण पहिल्यांदाच सीमेवर

Recruited Cadets
Recruited Cadetsesakal

सिन्नर (जि. नाशिक) : पाडळी गाव शेतीवर अवलंबून आहे. गावातील अतिशय कष्टाळू कुटुंबातील आठ तरुणांनी सैन्य दलात भरती झाले आहे. ठाणे येथे झालेल्या अग्निवीर आर्मी भरती मध्ये ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. गावाच्या इतिहासात प्रथमच आठ तरुण देशसेवा करणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Agniveer Recruitment 8 youths from Padali recruited into indian army nashik news)

पाडळी हे शेतीप्रधान गाव आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या येथील आठ तरुणांनी सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे ठरवत पाडळीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सैन्यभरतीसोबतच गावातील अनेक मुलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचीदेखील तयारी करत आहेत.

यापूर्वी सैन्यात भरती झालेल्या तरुणांचा आदर्श घेऊन येथील रस्त्यावर दररोज पहाटे व रात्री सुमारे शंभरपेक्षा अधिक तरूण नेहमी सराव करत असतात. याचेच फळ या तरुणांना मिळालेले आहे. रात्रंदिवस या तरुणांनी सराव करून देश सेवेसाठी पाहिलेले स्वप्न आज त्यांच्या यशाने पूर्ण झालेले आहेत.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

Recruited Cadets
Champa Shashti : चंदनपुरीत 25 हजार भाविक खंडोबाचरणी लीन; भरीत-भाकरीचा महाप्रसाद वाटप

यांची झाली निवड

अग्निवीर आर्मी भरतीमध्ये शिवराज शेजवळ, सूरज वर्पे, निखिल रेवगडे, तेजस रेवगडे, अभिषेक रेवगडे, मनोज रेवगडे, चेतन जाधव, अंकुश रेवगडे यांची निवड झाली.

मामाच्या कष्टाचे चीज

सैन्य दलात दाखल झालेल्या शिवराज शेजवळ या तरुणाच्या आईचे तो लहान असताना निधन झाले होते. मामा रामकृष्ण वारुंगसे यांनी कष्ट करत शिवराजला शिक्षणाचे धडे दिले. लहानाचे मोठे केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिवराजने मामाच्या कष्टाचे चीज केले आहे. यामुळे सर्व ग्रामस्थांकडून त्याचे कौतुक होत आहे.

Recruited Cadets
Nashik News : रंगीबेरंगी खड्यांपासून महात्मा फुलेंचे साकारले चित्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com