कृषि विभागाचा जावईशोध...म्हणे खतटंचाई नाही!

agricultural department
agricultural departmentesakal

येवला (जि.नाशिक) : युरिया खत टंचाई, लिंकिंग अन चढया दराने विक्रीमुळे तालुक्यात शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. याविरोधात प्रहार संघटनेने थेट प्रांताधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरीही कृषि विभाग प्रेस नोट देऊन टंचाई व लिंकिंग होत नसल्याचा अजब दावा करत आहे. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान तालुक्यासाठी विविध खते विक्रेत्यांकडे सध्या २६२ मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध झाले आहे. (Agriculture-Department-says-No-shortage-of-fertilizers-marathi-news-jpd93)

कृषि विभाग म्हणतोय खतांची टंचाई नाही!

तालुक्यात तब्बल दीड महिन्यापासून पिकांना वाढीसाठी लागणाऱ्या युरियासाठी वणवण फिरण्याची वेळ येत आहे. सध्या सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने त्यांना नत्रयुक्त खतांची तातडीची गरज आहे. परंतु कृषिविभागाच्या चुकीच्या धोरणामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांची लूट करत २६६ रुपयांची एक गोणी बरोबर १४०० रुपये किंमतीची दुसऱ्या खताची गोणी किंवा इतर खत घेण्याची सक्ती दुकानदारांकडून केली जात असल्याने खतांचा मोठा काळाबाजार होत असल्याने प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरीभाऊ महाजन व सहकाऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन केले. विशेष म्हणजे अर्धनग्न आंदोलन केल्याने राज्याचे लक्ष या प्रश्नांकडे वेधले गेले.

मग टंचाई झाली कशी ?

तालुका कृषि अधिकाऱ्यांनी तत्काळ विक्रेत्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. महाजन यांना लेखी आश्वासन दिले असून त्यात लिंकिंग होत असल्यास कारवाई करु असे म्हटले आहे. मग माध्यमांना माहिती देतांनाच टंचाई नसल्याचा साक्षात्कार कसा झाला हा प्रश्न उपस्थित होत आहे. टंचाई नसती तर प्रहारने इतके मोठे आंदोलन केले असते का? हाही प्रश्नच आहे.

शेतकऱ्यांना तक्रारीचे आवाहन

युरिया खताची टंचाई नसून लिंकिंग होत नाही.युरिया खताचे वाटप कृषी विभागाचे कर्मचारी अथवा अधिकारी यांचे समक्ष वाटप करण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.खत विक्रेते लिंकिंग करत असल्यास अशा दुकानदारास खत नियंत्रण कायदा १९८५ नुसार कारवाई करण्यात येईल,असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. कोणीही खत विक्रेते लिंकिंग करत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन देखील तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी केले आहे.

agricultural department
ज्येष्ठाचा आत्मदहनाचा इशारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

साडेचार हजार मेट्रिक टन पुरवठा

खरिपासाठी बएप्रिल ते जून अखेर २६५० मेट्रिक टन व जुलै महिन्यामध्ये १९८० मेट्रिक टन असे एकूण ४६३० मेट्रिक टन युरिया खताचा जून अखेर वेगवेगळ्या टप्प्यात पुरवठा झाला आहे.सध्या युरिया खत २६२ मेट्रिक टन विविध खते विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

agricultural department
महाविद्यालये सुरू होणार, पण 'ही' असेल अट : उदय सामंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com