नाशिक- खरीप हंगामात शेतकऱ्यांना बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा फटका बसत असल्याने कृषी विभागाने जिल्ह्यातील २४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करत त्यांना दणका दिला. यामध्ये १२ रासायनिक खते, ८ बियाणे आणि ४ कीटकनाशक विक्रेत्यांचा परवाना समाविष्ट आहे.