शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करायची कशी? बाजार समित्या बंद

agriculture market committees closed for ten days in nashik district
agriculture market committees closed for ten days in nashik districtesakal
Updated on

नाशिक : कांदा, सोयाबीनच्या दरात घसरण झाली असताना ऐन दिवाळीत जिल्ह्यातील बाजार समित्या दहा दिवस बंद राहणार आहेत. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी नाराजी व्यक्त केली. सांगा, शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करायची, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

श्री. दिघोळे म्हणाले, की दिवाळीत कांदा, सोयाबीन या पिकांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. दिवाळीत मिळेल त्या दरात शेतमाल विकून दोन पैसे हातात येण्याच्या वेळेसच सलग दहा दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यावरून केंद्र आणि राज्य सरकारचे शेतीविषयक धोरण तकलादू असल्याचे स्पष्ट होते. शेतीसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा, इंधनाचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. बाजार समित्या बंद असण्यामध्ये राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाचे मोठे अपयश आहे. त्यातच, कांदा व सोयाबीन पेंड आयात करून भाव पाडण्याची कामगिरी केंद्र सरकारने केली आहे.

agriculture market committees closed for ten days in nashik district
अष्टपैलू कामगिरीने नेतृत्व गाजवणारे डॉ. दौलतराव आहेर
agriculture market committees closed for ten days in nashik district
Nashik : फटाके विक्रेत्यांचा जीव धोक्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sanjay Garud Arrest Latest News
Saikheda schoolgirl story
Nashik Earthquake
Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor
Marathi News Esakal
www.esakal.com