Nashik : फटाके विक्रेत्यांचा जीव धोक्यात

संभाजी स्टेडियमवर हजार रुपयांच्या बदल्यात दोन वाळूच्या बादल्या
nashik
nashiksakal media
Updated on

सिडको : महानगरपालिकेच्या वतीने लिलावाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या फटाक्यांच्या स्टॉलला मनपा ‘अग्निशमन दला’कडून कुठल्याही प्रकारची सुरक्षा पुरविण्यात न आल्याने स्टॉलधारक व येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांची सुरक्षितता येथे धोक्यात सापडल्याचे आल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोनाच्या दोन वर्ष कालावधीनंतर प्रथमच स्टॉल धारकांना मनपाच्या वतीने फटाक्याचे स्टॉल वितरित करण्यात आले आहेत. ‘कोरोनात डबघाईस आलेले नागरिक फटाके खरेदी करतील का’ असा प्रश्नचिन्ह स्टॉलधारकांच्या मनात सतावत असताना देखील त्यांनी मोठ्या हिमतीने स्टॉल घेण्याचे धाडस केले. आगीपासून सुरक्षितता मिळावी, यासाठी त्यांच्याकडून पाच हजार रुपयांची पावती फाडली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र अग्निशामन दलाचे वाहन संभाजी स्टेडिअम येथे नाही. केवळ वाळूने भरलेल्या बादल्या नावाला या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास या वाळूच्या बादल्या कितपत तग धरतील, असा प्रश्न स्टॉलधारक व येणारे जाणारे ग्राहक उपस्थित करताना दिसत आहेत.

मनपाच्या वतीने संभाजी स्टेडिअमवर फटाके विक्रेत्यांना लिलावाच्या माध्यमातून स्टॉल वितरित केले आहे. त्यांच्याकडून अग्निशमन कराच्या रूपात पाच हजार रुपयाची पावती देण्यात आली आहे. परंतु त्या बदल्यात या ठिकाणी केवळ वाळूच्या बादल्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील स्टॉलधारक व ग्राहकांचे जीव धोक्यात आहे.

- पवन मटाले, शाखाप्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com