Onion Price Crash
esakal
कसबे सुकेणे (नाशिक) : बाजार समितीत कांद्याचे (Nashik Onion Market) दर मोठ्या प्रमाणात घसरले असून, सध्या कांदा सरासरी ६०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Price Crash) मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शरद जोशीप्रणीत नाशिक जिल्हा शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, केंद्र सरकारने कांदा बाजारभाव व निर्यातीबाबत तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.