संतोष विंचू : येवला- मॉन्सूनचे आगमन आणि खरिपाच्या पेरणीला अजून पंधरा दिवसांचा अवधी असला तरी भर उन्हाळ्यात पावसाळा सुरू असल्याने त्याचा परिणाम यंदाच्या खरिपाच्या पेरणीवर होणार आहे. मॉन्सूनअगोदरच पाऊस झाल्याने खरिपाची मशागत होत असून, काही भागात कांदालागवडीच्या दृष्टीने मुगाची पेरणी होत आहे.