लासलगाव- जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसाठी केंद्र सरकारने नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन (NCCF) मार्फत तीन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेला विलंब झाला आहे. यामुळे शेतकरी संभ्रमित झाले आहेत. एप्रिलमध्ये निविदाप्रक्रिया पूर्ण होऊनही तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्याप कांदा खरेदी सुरू झालेली नाही.