Agrowon scheme
sakal
नाशिक: ‘मित्र ग्लोबल शिवाराचा’ हे ब्रीद घेऊन कृषी व संलग्न क्षेत्रातील नवनवीन विषय, उपयुक्त तंत्रज्ञान, शेती क्षेत्राची अद्ययावत माहिती व यशोगाथांची मांडणी करणाऱ्या ‘ॲग्रोवन’ने शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रोवन वर्गणीदार योजना २०२५’ आणली आहे. या योजनेचा प्रारंभ शुक्रवारी (ता. ५) ‘सकाळ’च्या सातपूर येथील कार्यालयात करण्यात आला. योजनेचे विक्रेत्यांनी स्वागत केले असून, येणाऱ्या रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ती शेतकरी वर्गासाठी फायदेशीर ठरणार आहे.