Bribe
sakal
नाशिक
Crime News : लाच प्रकरणातील ‘युती’ दोघांना भोवली; पोलिसासह स्थानिक नेता ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
Drug Case Leads to Illegal Bribe Demand by Police Constable : अहमदनगर (अहिल्यानगर) शहरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईतील आरोपीच्या भावाकडून ५ लाखांची लाच मागणाऱ्या एका पोलीस हवालदार आणि राजकीय नेत्याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जेरबंद केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी अत्यंत शिताफीने पूर्ण केली.
अहिल्यानगर शहरात पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई केली. तपासात गांजा आढळून आलेल्या संशयिताच्या आर्थिक व्यवहारात त्याचा भाऊ असल्याचा बहाणा करीत तपास करणाऱ्या पोलिसाने गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. गुन्हा टाळण्यासाठी शहरातीलच एका राजकीय नेत्याच्या मध्यस्थीतून पाच लाखांच्या लाचेची मागणी केली. त्या दोघांवर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून धडक कारवाई केली. यात पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी अत्यंत खुबीने या गुन्ह्याचा तपास करीत दोघांना बेड्या ठोकल्या.
