AI Voice Scam
sakal
नाशिक
AI Voice Scam : 'दादा, २० हजार पाठव ना'; तुमचा आवाज क्लोन करून AI ने फसवणुकीचा नवा डाव टाकला
The Rise of AI Voice Scams in India : सायबर गुन्हेगारांनी आता 'एआय व्हॉइस क्लोनिंग' तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणुकीचे नवे प्रकार सुरू केले आहेत. यामुळे तातडीच्या पैशांच्या मागणीवर विश्वास ठेवण्यापूर्वी व्हिडिओ कॉलद्वारे खात्री करणे आवश्यक आहे.
नाशिक: ‘दादा, मोठी अडचण झालीय, जरा पटकन २० हजार पाठव ना.‘ फोनवरचा आवाज, शब्द, टोन, घाई अगदी सर्व शंभर टक्के जवळच्या व्यक्तीसारखे. क्षणात विश्वास बसतो; परंतु पैसा पाठवून झाल्यावर जे सत्य समोर येते, ते हादरविणारे असते. तो फोन ‘त्या’ व्यक्तीने नव्हे, तर एका स्कॅमरने ‘एआय जनरेटेड‘ आवाज वापरून केलेला असतो.
