नाशिक: दिवसेंदिवस वाढते प्रदूषण जीवघेणे ठरत असतानाच, वाहनांच्या धुराड्याची त्यात आणखी भर पडत आहे. एकेकाळी थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या प्रदूषणात वायुप्रदूषणाची भर पडत आहे. प्रामुख्याने, दूषित धूर सोडणारी वाहने रस्त्यांवरून सर्रास धावत असून, त्याकडे प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई होताना दिसत नाही. ज्यांना कारवाईचे अधिकार आहेत, तो प्रदूषण विभागच कुंभकर्णाच्या झोपेत आहे.