Nashik Airport Expansion : नाशिकच्या विकासाला नवे पंख! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन
Nashik Airport Expansion Project Inauguration : नाशिक (ओझर) विमानतळाच्या सुसज्ज टर्मिनल इमारतीचे मॉडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या विस्तारीकरण प्रकल्पाचा शुभारंभ होत असून, यामुळे विमानतळाची प्रवासी क्षमता प्रतितास १,००० पर्यंत वाढणार आहे.
नाशिक: नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (ता. ८) पार पडणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाचा चेहरामोहराच यामुळे बदलणार आहे.