Ajit Pawar
sakal
नाशिक
Ajit Pawar : राजकारणातील ‘दादा’ पर्व संपले
Leaders Across Parties Pay Tribute to Ajit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नाशिकमधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.
स्पष्टवक्ते, वक्तशीरपणा, जागेवरच निर्णय घेण्याची क्षमता असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. तत्काळ निर्णयक्षमता असलेल्या अशा नेत्याच्या जाण्याने राज्यासह देशाची कधीही भरून न येणारी हानी झाल्याचे जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिवसभरात आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
