Ajit Pawar
sakal
पिंपळगाव बसवंत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनाच्या वृत्ताने संपूर्ण पिंपळगाव बसवंत शहर शोकसागरात बुडाले आहे. आमदार दिलीप बनकर यांचे निकटवर्तीय आणि निफाड तालुक्यावर विशेष प्रेम असलेल्या अजितदादांच्या निधनामुळे पिंपळगावकरांनी उत्स्फूर्तपणे बाजारपेठ आणि दैनंदिन व्यवहार बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.