
माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. परिणामी राज्यातील सहकारी राजकारणात त्यांचा कमबॅक असून यापुढे माळेगावचे व्यवस्थापन व नियोजन पवार यांच्या हाती असणार आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष पवार हे ब वर्ग संस्था मतदार संघातून १०१ पैकी ९१ मतांनी निवडून आले आहेत. त्यांना प्रशासनाबरोबर सहकार क्षेत्रात सुमारे ३५ वर्षांचा अनुभव आहे.