Nashik District Bank: जिल्हा सहकारी बँकेला सावरणार; कठोर पावले उचलण्याचे अजित पवार यांचे निर्देश

Nashik District Bank
Nashik District Bankesakal

Nashik District Bank: शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिकसह बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने आवश्यक पावले उचलण्यात यावीत, वित्त व नियोजन आणि सहकार विभागाने यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. (Ajit Pawar instructions to take strict steps to save District Cooperative Bank nashik news)

उपमुख्यमंत्री पवार यांनी अडचणीतील मध्यवर्ती सहकारी बँकांचा नागपूर विधानभवनातील समिती कक्षात शुक्रवारी (ता. १५) आढावा घेतला. बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार माणिकराव कोकाटे व संबंधित सचिव, अधिकारी, तसेच विभागीय सहकार सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), बँकाचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. आमदार दिलीप बनकर आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, वर्धा व बुलडाणा जिल्हा बँका सुस्थितीत आणण्यासाठी या बँकांवर चांगले प्रशासक नेमण्यात यावेत. बँकांच्या या स्थितीस कारणीभूत ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक यांच्यावर कारवाई करावी.

Nashik District Bank
Nashik District Bank: कर्जवसुलीसाठी जिल्हा बॅंकेची नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना; जाणून घ्या सविस्तर

दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यासह बँकांच्या थकीत कर्जदारांची मालमत्ता जप्त करावी. मालमत्तांचे लिलाव करून त्यातून वसुली करण्याच्या दृष्टीने बँकेने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

बँकांना भागभांडवल उपलब्ध करून देण्याच्या मागणीबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, की शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासह उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना आखण्यासाठी बँकांना शासन हमी किंवा भागभांडवल देण्याबाबत वित्त व नियोजन विभागाने उपाययोजना सुचवाव्यात. राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जाऊ शकतात. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वित्त विभागामार्फत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठेवण्यात यावा, अशी सूचनाही श्री. पवार यांनी केली.

Nashik District Bank
NAMCO Bank Election: शरद पवार गट राहिला बाजूला; राष्ट्रवादी वगळता सर्वपक्षीय उमेदवार रिंगणात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com