Ajit Pawar
sakal
नाशिक: नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. सात आमदारांमध्ये तिघांना मंत्रिपदे दिल्यावरही पक्षसंघटनात अपेक्षित प्रगती झालेली नाही, अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील मंत्र्यांनी आणि आमदारांनी पक्षवाढीसाठी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.