MIM ही भाजपची B Team : अजित पवार

Leader of Opposition Ajit Pawar at the civil felicitation of former MLA Rashid Sheikh. NCP State President Jayant Patil, Asif Sheikh, Tahera Sheikh etc.
Leader of Opposition Ajit Pawar at the civil felicitation of former MLA Rashid Sheikh. NCP State President Jayant Patil, Asif Sheikh, Tahera Sheikh etc.esakal

मालेगाव : मालेगाव मध्यचे एमआयएमचे विद्यमान आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपच्या कार्यक्रमांना व्यासपीठावर बसतात. ‘एमआयएम’ ही भाजपची बी टीम आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात मुस्लिम समाजातील नागरिकांवर मॉब लिंचिंगचे प्रकार होत आहेत.

केंद्र व राज्य सरकार अल्पसंख्याक समाजावर अन्याय व भेदभाव करीत आहे. केंद्राविरोधात बोलणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीची कारवाई करून त्यांचा आवाज दाबला जात आहे. एमआयएम पक्ष हा फक्त मुस्लिम समाजाचे मतांचे विभाजन करून भाजपला फायदा पोहचविण्याचे काम करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. (ajit pawar statement on bjp MIM relations malegaon news)

येथील नुरबाग मैदानावर माजी आमदार रशीद शेख यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सईद फैजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, सत्कारमूर्ती रशीद शेख, माजी महापौर ताहेरा शेख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रशीद शेख यांचा शाल, श्रीफळ व चांदीची तलवार भेट देवून नागरी सत्कार करण्यात आला.

श्री. पवार म्हणाले, रशीद शेख यांच्या काळात मालेगावात अनेक विकासकामे झाली. त्यांनी ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत शहराचा पायाभूत विकास साधला. महाविकास आघाडी सरकारने शहरातील रस्ते काँक्रीटकरणासाठी २० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

शिंदे- फडणवीस सरकारने १० कोटी रुपये निधीला ब्रेक लावला आहे. या निधीसाठी न्यायालयीन लढा सुरू आहे. शहराच्या विकासाकरीता महाराष्ट्र स्वर्ण जयंती अभियानांतर्गत निधी मिळवून देऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने देशात हिंदू- मुस्लिम वाद निर्माण करून जनतेला विकासापासून वंचित ठेवले आहे. मुस्लिम समाजावर सीएए, एनआरसी हे कायदे लादून दहशत निर्माण केली जात आहे.

भाजप सरकारने बिलकीस बानो यांच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणातील अकरा आरोपीची सुटका केली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असे तिघे पक्ष मिळून काम करणार असून, भाजप- शिंदे गटाला त्याची जागा दाखवू, असा इशारा त्यांनी दिला.

Leader of Opposition Ajit Pawar at the civil felicitation of former MLA Rashid Sheikh. NCP State President Jayant Patil, Asif Sheikh, Tahera Sheikh etc.
Agriculture News : परतीच्या पावसाच्या विश्रांतीमुळे मका काढणीला वेग

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी स्वागत केले. सत्कारमूर्ती रशीद शेख यांनी आगामी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार व महापालिकेत महापौर असेल, अशी ग्वाही दिली. मला मालेगावतील हिंदू- मुस्लिम अशा दोन्ही समाजाने भरभरून प्रेम दिले. हे प्रेम मी कधीच विसरु शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांदीची तलवार दिली किडनीग्रस्ताच्या उपचारासाठी

शहरातील किडनीग्रस्त असलेल्या शेख इनायत (वय २६, रा. सलामताबाद) या तरुणाची किडनी खराब असल्याने किडनी बदलण्यासाठी सहा लाख रुपये खर्च येणार आहे. इनायत यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या उपचारासाठी श्री. शेख यांना भेट दिलेल्या सव्वा किलो चांदीच्या तलवाराची आसिफ शेख यांनी सभेत बोली लावली.

या वेळी मुश्ताक अहमद यांनी ३ लाख ५१ हजाराला ती घेतली. श्री. पवार, श्री. पाटील, श्री. झिरवाळ यांनीही त्यांना भेट दिलेली तलवार इनायतच्या उपचारासाठी संबंधितांकडे दिली. या निर्णयाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

Leader of Opposition Ajit Pawar at the civil felicitation of former MLA Rashid Sheikh. NCP State President Jayant Patil, Asif Sheikh, Tahera Sheikh etc.
Nashik Crime News : बोनसची मागणी केल्याने सफाई कामगारांना मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com