

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनेलने विजयी घौडदौड केल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. निकालाच्या दुसऱ्या फेरीतही तणावपूर्ण वातावरण होते. मात्र विजय दृष्टीक्षेपात आल्यानंतर गुलालाची उधळण करत व फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.