Ajit Pawar
sakal
येवला: येवला शहरावर उपमुख्यमंत्री (स्व.) अजित पवार यांचे विशेष प्रेम होते, तसेच येथील मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार मारोतराव पवार, संभाजीराजे पवार, सहकार नेते अंबादास बनकर, माणिकराव शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे या नेत्यांशी त्यांनी स्नेह जपला. येवल्याच्या विकासात अजितदादांनी दिलेले योगदान मोलाचे असून त्याबद्दल नागरिकांच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.