Fake RTGS Attempt
sakal
जुने नाशिक: जुने आग्रा रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अॅन्ड रिसर्च, नाशिक यांच्या नावाने बोगस ‘आरटीजीएस’ व्यवहाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बनावट सही करून धनादेशावरील रक्कम लाटण्याचा प्रयत्न संशयिताकडून करण्यात आला. मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे संशयिताचा डाव फसला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.