Akshaya Tritiya 2024 : मार्केट यार्डात तीनदिवसीय आंबा महोत्सव; विविध प्रजातीचे नवनवीन आंबे उपलब्ध

Nashik News : अक्षयतृतीयेच्या निमित्ताने पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात तीनदिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
Devidas Pingle and dignitaries inspecting the mango festival.
Devidas Pingle and dignitaries inspecting the mango festival.esakal

पंचवटी : अक्षयतृतीयेच्या निमित्ताने पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात तीनदिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी साडेदहाच्या सुमारास नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले.

या वेळी बाजार समिती संचालक संदीप पाटील, व्यापारी ईश्वर गुप्ता, राजू पिंगळे, राजेंद्र भागवत, बागवान, विशाल गवळी, राहुल आहेर, मनोज बडगुजर, दीपक बोधले, सचिन फडे, संतोष रोडगे, सचिन कोठुळे, गोपाळ सानप, रौफ बागवान व व्यापारी- आडते उपस्थित होते. तसेच बाजार समिती सचिव प्रकाश घोलप.

सहाय्यक सचिव विजू निकम, मनोज महाले, फळ विभाग कर्मचारीदेखील उपस्थित होते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेली अक्षयतृतीयेचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर घराघरांत होणाऱ्या पितरांच्या पूजेसाठी लागणाऱ्या पूजा सामग्रीमध्ये आंबा असतो. नैवेद्य म्हणून आंबा रस असतो. (latest marathi news)

Devidas Pingle and dignitaries inspecting the mango festival.
Nashik Crime News : अपघातप्रकरणी आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

त्यासाठी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात आंबा घेण्यासाठी गर्दी होत असते. त्याअनुषंगाने नाशिककरांसाठी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात फळ विभागातील एमआर फ्रूट कंपनी, चामुंडा फ्रूट कंपनी व गवळी ब्रदर्स यांनी संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

बुधवार सकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांच्या हस्ते फीत कापून उद्‌घाटन करण्यात आले. जुनागढ केशर, रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, बंगलोर लालबाग, विजयवाडा बदाम, आम्रपाली गुजरात, हैदराबाद मलिका.

रत्नागिरी पायरी, रत्नागिरी केशर या प्रजातीचे नवनवीन आंबे उपलब्ध आहे. तरी नाशिककरांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन फळ विभागाचे व्यापारी आडते यांनी केले आहे.

Devidas Pingle and dignitaries inspecting the mango festival.
Nashik News : पारंपारिक घाण्याच्या तेलाकडे वाढता कल; आरोग्याबद्दल सजगता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com