Nashik News : पिंपळगाव सोसायटीचे सर्व संचालक अपात्र; जिल्ह्यातील पहिलीच घटना

निवडणूक खर्च सादर न केल्याने सहाय्यक निबंधकांची कारवाई
Order
Order esakal

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : पिंपळगाव मोर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादीत संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांसह संपूर्ण १२ संचालकांना निवडणूक खर्च सादर न केल्याने मंगळवारी (ता.२८) अपात्र घोषित करण्यात आले आहे.

निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर केला नाही म्हणून संपूर्ण सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. (All Directors of Pimpalgaon Society disqualified first incident in district Nashik News)

या कारवाईमुळे जिल्हाभरात सहकार क्षेत्राचे चांगलेच धाबे दणाणले आहे. इगतपुरीच्या सहकारी संस्था सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांनी या बाबतचा आदेश पारित केला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरीक्षक अशोक मधुकर साळवे यांची या सोसायटीवर प्रशासक म्हणून तातडीने नेमणूक करण्यात आली आहे.

सोसायटीचे सभासद युवराज तुकाराम गातवे यांनी दाखल केलेल्या विवाद अर्जानुसार दोन्ही पक्षांना उचित संधी देऊन सुनावणी घेण्यात आली होती. त्यानुसार हा आदेश पारित करण्यात आला.

सध्या सुरु असलेल्या घोटी बाजार समिती निवडणुकीच्या काळात १२ जण अपात्र झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दिसून येणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Order
Nashik News: शाळकरी मुलाला वाचविताना क्रूझरने तीन पलटी घेतल्या; मध्यप्रदेशातील 10 शेतमजूर जखमी

सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांनी अपात्र ठरवलेल्या संचालकांत सुरेश संतू काळे, विजय भिका पवार, संतू नामदेव काळे, उत्तम एकनाथ बेंडकोळी, दत्तू चंदर पगारे, काळू देवजी मेंगाळ, मनोहर पोपट बेंडकोळी, भगवंता निवृत्ती सोनवणे, बाळू गोविंद बेंडकोळी, मीराबाई कचरू काळे, कौशाबाई संतू बेंडकोळी, गोरख बाजीराव काळे यांचा समावेश आहे.

हे संचालक महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ व ( प्रथम सुधारणा) नियम २०१८ मधील नियम ६६ अन्वये अपात्र झाले आहे. या आदेशानुसार संस्थेचे संचालक मंडळ अर्थात व्यवस्थापक समिती निष्प्रभावित झाली आहे.

या संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नेमणूक झाली असून प्रशासकपदाचा कालावधी हा पदभार घेतल्यापासून ६ महिन्यांसाठी लागू असणार आहे.

Order
Pimpalgaon Market Committee : सत्तासंघर्षापूर्वी रंगली न्यायालयीन लढाई!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com