Nashik News: जिल्ह्यातील सर्व उद्योग २ जूनला बंद; उद्योजकांच्या बैठकीत एकमुखी निर्णय

Entrepreneurs attending the meeting
Entrepreneurs attending the meetingesakal

Nashik News : निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला हा उद्योगावरील हल्ला असून त्याचा निषेध म्हणून शुक्रवारी (ता. २) जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा तसेच त्या दिवशी काळ्या फिती व काळे मास्क लावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय आयमा कार्यालयात झालेल्या सर्व उद्योग व व्यापारी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. (All industries in district closed on June 2 Unanimous decision in business meeting AIMA Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Entrepreneurs attending the meeting
Nashik Leopard News : बिबट्याचा वावर अन् शेतकरी, मजुरांना धास्ती; बंदोबस्ताची मागणी

बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी व हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी आयोजित बैठकीत उद्योजकांच्या विविध घटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून संतापला वाट मोकळी करून दिली.

व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, निमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, एनसीएफचे हेमंत राठी, मनीष कोठारी, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र कोठावदे, वरुण तलवार, बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे,

विवेक पाटील, इमाचे विष्णू गुंजाळ, निपमचे हेमंत राख, जयप्रकाश जोशी, लोकेश पीचाया, मनीष रावल, विराज गडकरी, विजय जोशी, सुमीत बजाज, श्रीलाल पांडे, देवेंद्र राणे, देवेंद्र विभूते, जयंत जोगळेकर, राधाकृष्ण नाईकवाडे, दिलीप वाघ, कुंदन डरंगे, रवींद्र झोपे, रामचंद्र जोशी, विलास लिधुरे, अविनाश मराठे,

अविनाश बोडके, गौरव धारकर, अभिषेक व्यास, राहुल गांगुर्डे, अशोक ब्राह्मणकर, अजय यादव, वैभव जोशी आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक निमाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी केले. हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे अशी भूमिका राजेंद्र कोठावदे व लोकेश पिचाया यांनी मांडली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते आदींना निवेदने पाठविली पाहिजे, अशी भूमिका हेमंत राठी, शरयू देशमुख, छावा माथाडी संघटना, जयप्रकाश जोशी, रोशन देशपांडे, मनीष कोठारी, कल्पना शिंपी, ज्ञानेश्वर गोपाळे, संतोष मंडलेचा यांनी मनोगतात मांडली.

Entrepreneurs attending the meeting
Nashik News: अनियमिताबद्दल कृषी निविष्ठा केंद्रांवर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com