esakal | वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात; नाशिक पोलीस आयुक्तांचा मुलांना दणका
sakal

बोलून बातमी शोधा

father

वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : ८१ वर्षांचे वृद्ध व्यक्तीचा त्यांची तीन मुले हे उदरनिर्वाह करता येत नसल्याने त्यांनी आपल्या वडिलांना जिवंतपणीच उंटवाडी स्मशानभूमीत आणून सोडले होते. यानंतर संबंधित वृद्ध उंटवाडी स्मशानभूमीमध्ये मृतकांचे सरणावर लाकडे रचण्याचे काम करून त्यातून येणाऱ्या पैशातून चरितार्थ भागवीत होते. सदरची बातमी ‘सकाळ’ने प्रकाशित केली. (file-charges-against-children-who-left-father-alive in-cemetery)

आई-वडिलांवर अन्याय, अत्याचार कराल तर सावधान..!

पोटच्या पोरांनी जन्मदात्याला जिवंतपणीच स्मशानभूमीत आणून सोडल्याची बातमी ‘सकाळ’ने उजेडात आणली होती. आता दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या बातमीची दखल घेत संबंधित वृद्ध व्यक्तीच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे मुलांना महागात पडले आहे. तसेच अशा प्रकारे आपल्या आई-वडिलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांसंदर्भात तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहनदेखील पांडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले आहे.

पोलिस आयुक्तांचे मुलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

ती पोलिस आयुक्त यांच्या वाचण्यात आल्यानंतर त्यांनी अशा प्रकरणांमध्ये पालक व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ अन्वयेच्या तरतुदीनुसार कार्यवाही करावयाचे ठरविले आहे. यासाठी त्यांनी कलम १८ नुसार जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याबाबत कळविले असून, सदर प्रकरणी चौकशीअंती दखलपात्र गुन्हा निष्पन्न होत असल्यास सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करणेबाबतदेखील सदर प्रसिद्धिपत्रकात उल्लेख केलेला आहे.

हेही वाचा: नाशिक शहर पोलिस ठाण्यांमध्ये लवकरच ‘नवा गडी-नवा राज’

हेही वाचा: इगतपुरी रेव्ह पार्टीतील २५ संशयितांना न्यायालयीन कोठडी

loading image