H3N2 Flu Case Rise : कोविडसोबतच ‘एच-एन इन्फ्लुएन्झा’ रुग्ण संख्येत वाढ

Flu H3N2
Flu H3N2esakal

नाशिक : कोविडसोबतचं आता ‘एच ३, एन २’ (H3N2) या इन्फ्लुएन्झा रुग्णाच्या संख्येतही वाढ होत आहे.

गेल्या आठवड्यात ‘एच ३ एन २’ चे चार रुग्ण आढळले होते. या आठवड्यात पुन्हा पाच रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी (ता.२४) कोविडचे ११ रुग्ण नव्याने आढळले आहेत. (along with Covid number of H3N2 influenza patients is also increasing nashik news)

हवामानातील तापमान व गारव्याच्या चढ- उतारामुळे कोविडसोबतच आता ‘एच ३ व एन २’ या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेला सूचना देण्यात आल्या. त्यानुसार रुग्ण तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. ‘एच ३ व एन २’ या विषाणू व स्वाईन फ्लूची लक्षणे सारखीच आढळून येत आहे.

त्यामुळे वैद्यकीय विभागाने १ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत शहरात आढळून आलेल्या स्वाईन फ्लूच्या १७ रुग्णांच्या नमुन्यांची फेरतपासणी केली. त्यात शहरात ‘एच ३ व एन २’ या विषाणूचे चार रुग्ण आढळले. त्यात पाच रुग्णांची भर पडली आहे. पाच रुग्णांपैकी दोन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तिघांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Flu H3N2
Rain Damage Crops : वीस मिनिटांच्या गारांनी कष्टावर फिरवले पाणी! आता कर्ज फेडायची चिंता

शहरात कोविडचेही रुग्ण वाढत आहे. शुक्रवारी (ता. २४) शहरात एकाच दिवशी ११ रुग्ण आढळले. कोविड, इन्फ्लुएन्झाची लक्षणे सारखीच आहेत. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास तत्काळ उपचार करून घ्यावेत, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले.

Flu H3N2
Farmer News: अवकाळी अन् गारपीटीनंतर बळीराजावर आश्वासनांचा पाऊस; नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com