Nashik Crime : गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या खुनातील चौथा संशयित अखेर गजाआड
Fugitive Arrested in Last Year’s Shivajinagar Murder Case : नाशिकमधील गंगापूर शिवारातील शिवाजीनगर येथे मार्च २०२४ मध्ये झालेल्या रितेश माथे खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी रोहित हुमबहादूर थापा याला अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुण्यातून अटक केली. हा आरोपी यापूर्वी इंदूर आणि रत्नागिरी येथे वास्तव्यास होता.
नाशिक: गंगापूर शिवारातील शिवाजीनगर येथे तरुणाची किरकोळ कारणातून खून केल्याची घटना गेल्या वर्षी मार्चमध्ये घडली होती. या गुन्ह्यातील संशयिताला अंबड गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. यापूर्वीच तिघांना अटक झाली आहे.