सातपूर- घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने अंबड औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कारखान्यात ट्रेनी कामगार म्हणून काम करणाऱ्या ऋषीकेश सातपुते (वय २६) या युवकाने देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले होते. नोकरी करत असल्याने आयुष्याचा जोडीदार शोधून साखरपुडा निश्चित केला होता. मात्र नियतीला काही औरच मान्य होते.