Ambad Crime Case: चोरलेली कोठी विहिरीतून काढली बाहेर

Police showing the jewels found in the vault at CIDCO, Nashik Crime case
Police showing the jewels found in the vault at CIDCO, Nashik Crime case esakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : कर्डेल मळ्यात झालेल्या खून प्रकरणात सोमवारी (ता. ५) पोलिसांनी विधीसंघर्षित बालकाने चोरून नेलेली कोठी दातीर मळा परिसरातील विहिरीतून बाहेर काढली. बच्चू सदाशिव कर्डेल यांचा २५ नोव्हेंबरला अज्ञाताने खून केला होता. या वेळी त्यांच्या घरातील कोठीतून पाच लाखाची रोकड लंपास झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मयत बच्चू कर्डेल यांचा पुतण्या सागर कर्डेल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याचा विधीसंघर्षित मित्राला सुपारी देऊन सदर खुनाचा प्रकार घडवून आणल्याचे सांगितले. (ambad Kardel murder case Stolen trunk taken out from well Nashik crime news)

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Police showing the jewels found in the vault at CIDCO, Nashik Crime case
Nashik Crime News: ग्रामीण पोलिसांचा जिल्ह्यात अवैध धंद्यांना झटका; महिनाभरात 78 लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान या प्रकरणात पाच लाख रुपये रोख रक्कम असलेली कोठी संशयित विधीसंघर्षित बालकाने दातीर मळा येथील एका विहिरीत टाकली होती. ही कोठी विहिरीच्या बाहेर काढून तपासणी केली असता, दोन सोन्याच्या पुतळ्या, चांदीचे दोन बाजूबंद, बुरखा, हत्यार, कागदपत्रे व कपडे असा ऐवज मिळून आला. तर पाच लाख रुपये असलेली पिशवी फाडून विधीसंघर्षित बालकाने ते पैसे त्याच्या एका मित्राकडे ठेवायला दिल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, या विधीसंघर्षित बालकाने आपली ओळख पटू नये याकरिता बुरख्याचा वापर केला असल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे करत आहेत.

Police showing the jewels found in the vault at CIDCO, Nashik Crime case
Nashik Crime News : घरफोड्या 2; गुन्हा मात्र एकच! : पोलिसांची अजब शक्कल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com